
5 किलो patience , 5 किलो hard work आणि 90 किलो नशीब लागते जंगल मध्ये वाघ पाहण्यासाठी, मी माझ्या पहिल्या जंगल सफारी चे काही मजेदार किस्से आपल्या बरोबर शेयर करत आहे. मला जंगला मध्ये फिरण्याचा काही अनुभव नाही, पण जंगल हे खूप मजेशीर आणि कितीतरी गोष्टी शिकवणारे आहे हे आपल्या लक्षात येईल.
दिवस होता २५ फेब २०1१, मी आणि डॉक्टर रेडी होतो आमचा प्रवासासाठी, आमची ट्रेन ९.३० वाजता मुंबईहून सुटणार होती, नंतर गडबड नको ह्याची काळजी घेऊन आम्ही २.३० च्या बस चे तिकीट आधीच कडून ठेवले होते. आम्ही बरोबर २.३० ला आमच्या stop वर म्हणजे चांदणी चौकात पोहोचलो, बस २.३० ला स्वारगेट हून निघणार होती तिला आमच्यापाशी पोहोचायला ३ तरी वाजतील असे आमचे गणित होते. डॉक्टर एक खूप चांगले पक्षी निरीक्षक आहेत त्यामुळे मला खूप नवीन नवीन माहिती कळत होती, गप्पा रंगात आल्या असतानाचा ३.3० झाले, आमच्या बस चा पत्ता नव्हता.
अजूनही खूप वेळ असल्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. बाजूला वडाप वाले खूप मागे लागले होते पण आम्ही महामंडळाच्याच गाडीने जायचे असे ठरवले होते आणि त्यांना पळवत होतो. इतक्यात एक निम आराम बस आली, आम्ही सुटकेचा निश्वास टाकला, पण बस जशी जवळ आली तसे समजले हि तर सातारा हून आली आहे आणि हि आमची बस नाही. बस चांगली ५ मिनिटे थांबली होती. Stop वर जेमतेम ५ लोक होते , बस त्यांना घेऊन मार्गस्त झाली. आम्ही परत बस ची वाट पाहू लागलो.
"साहेब तुम्हाला १.३० तासात मुंबई ला पोहोचवतो"
"साहेब एक तासामध्ये पनवेल येईल"

४ वाजले , साडे चार वाजले बस चा पत्ता नाही, आता मात्र आमची गडबड सुरु झाली. आम्ही ठरवले आता जी गाडी मिळेल त्याचे जायचे, पण आता कुठलीच बस येईना, विकेंड असल्या मुळे कार्स पण फुल होत्या, वडाप वाले निघून गेले होते. आमची सफर वाया जाते कि की असे वाटू लागले. आता घरी जाऊन NGC वर वाघ पाहावे लागणार होते.
आम्ही एका कारला थांबवले एवढ्यात जोशीचा फोन आला ( जोशी आमचे tour organizer होते ), आम्हाला सहज केलेला फोन आता जोशीचे BP वाढवणार होता, कारण गाडीला आता ४ तास बाकी होते आणि आम्ही अजून पुण्यात होतो. आता येईल त्या बसच्या काचा फोडाव्यात असे वाटत असतानाचा एक बस आली, पाटी वर " स्वारगेट मुंबई " लिहिले होते.
हि बस २.३० आहे असे कळल्यावर आम्हाला महामंडळाचा महानतेची खात्रीच पटली, बस फक्त २ तास उशिरा आली होती. बस मध्ये चढताना आम्ही सुटकेचा निश्वास टाकला, पण रस्त्यामधला खड्ड्यांमुळे बसणाऱ्या धक्क्यानं बरोबर आम्हाला अजून बरेच धक्के बसने बाकी होते. सुरवात वाहकाने केली, " दोन तास बस ची कोण वेडा वाट बघतो" असे समजून त्याने आमचा जागा आधीच देऊन टाकल्या होत्या.....
हि बस २.३० आहे असे कळल्यावर आम्हाला महामंडळाचा महानतेची खात्रीच पटली, बस फक्त २ तास उशिरा आली होती. बस मध्ये चढताना आम्ही सुटकेचा निश्वास टाकला, पण रस्त्यामधला खड्ड्यांमुळे बसणाऱ्या धक्क्यानं बरोबर आम्हाला अजून बरेच धक्के बसने बाकी होते. सुरवात वाहकाने केली, " दोन तास बस ची कोण वेडा वाट बघतो" असे समजून त्याने आमचा जागा आधीच देऊन टाकल्या होत्या.....
To be continued ..