Sunday, February 24, 2013

A longest Working Day


A longest Working Day  by Nilesh Patankar




सकाळी ९ ची वेळ रस्त्यावरची रोजची अडथळा शर्यत पार करत ऑफिसमध्ये पोहोचलो.  कार्ड पंच केलेअर्थात 'आम्ही आलोतहि वर्दी देऊन ऑफिसमध्ये प्रवेश केला.
अजून आत शुकशुकाट होता. कुठेतरी १-२ जण आले होते, कीबोर्डची खडखडफोनच्या आणि मोबाईलच्या अखंड चालू असणाऱ्या रिंग्स आणि त्याहून मोठयांदा चालणारी लोकांची बडबड ह्यातले काही अजून चालू झाले नव्हते. सर्वत्र एक शांत आणि प्रसन्न वातावरण, अर्थात  माझी ऑफिस मधली सर्वात आवडती वेळ.

नेहमी प्रमाणे मी इनबॉक्स ओपन केलाडझनभर मेल माझी वाट पाहत होते.
‘बापरे आज तर खूपच काम आहे, आज अजिबात वेळ वाया घालवायचा नाही’ असा विचार करून कोणत्याही कर्तव्यदक्ष्य आणि कार्यतत्पर आईटी इंजिनिअर प्रमाणे मी कॅन्टीनचा रस्ता धरला..

नेहमी प्रमाणे एक सामान्य दिवस चालू झाला होता.

मनसोक्त चहा मारून डेस्कवर परत आलो. आता शांतताप्रसन्नता कुठेतरी गायब झाली होती. सगळीकडे कामाची धावपळ चालू झाली होती. एक एक करून मेल वाचणे चालू केले.

आणि माझे हास्य एकदम गायब झालेचेहर्याचा रंग उडाला  
कारणच तसे होते आज  परत "GO LIVE" होते.
म्हणजे आज रात्रीचा आमचा मुक्काम ऑफिसमध्ये.

रात्रीचे १०-१०.३० वाजले असावेतआमचा दुसरा पेग चालू होता अजून ऑफिसचे काम सुरु होण्यासाठी बराच वेळ होता. सगळे अगदी ठरल्याप्रमाणे चालू होते. अगदी लिमिटमध्ये घेऊन आम्ही परत निघणार होतो, आमचं एक आहे बाकी काही असो पण कुठल्याही गोष्टीमध्ये अती करायचे नाही. त्यात आज तर ओवर नाईट ऑफिसमध्ये काम करायचे आहे. त्यामुळे अगदी लिमिटेड. आम्ही निघणार इतक्यात अजून एक मित्र जॉईन झाला. मग त्याला कंपनी म्हणून आम्ही अजून एक एक पेग मागवला.  मी तसा नेहमी लिमिट मधेच असतोपण मैत्री.. ती सुद्धा जपली पाहिजे. ११ वाजले आता लवकर पोहोचले पाहिजे म्हणून बिल मागवले तोच तो मित्र म्हणाला, "अजून एकच स्मॉल   मग जा तुम्ही Go live च्या नावाचा एक लास्ट".       
तुमचा गैरसमज नको म्हणून सांगतो.  मी नेहमी लिमिट मधेच असतो आणि काहीही झाले माझा हा नियम मी कधी मोडत नाही, शिस्त म्हणजे शिस्त. पण आज माझा थोडा नाईलाज झाला, Go live च्या नावाचा पेग सोडून जाणे म्हणजे.  परत सांगतो मी काही अंधश्रद्धाळू नाही   पण कसे आहे कशाला उगाच पनौती. टू बी ओन सेफ साईड  नाहीतर तुम्हाला माहित आहेच लिमिट म्हणजे लिमिट, मी नेहमीच लिमिट मध्येच असतो. मी हि गोष्ट परत परत सांगत आहे असे वाटेल तुम्हाला पण हा चार पेग चा परिणाम नाही, माझा नियम म्हणजे काळ्या दगडा वरची रेघ हवतर तुम्ही माझ्या कोणत्याही मित्रांना कधीही विचारू शकता.
ते लगेच सांगतील कि मी कसा नेहमी लिमिट मध्ये असतो.

रात्रीच्या मोकळ्या रस्त्यावरून सुसाट गाडी चालवत आम्ही १२ च्या आसपास ऑफिसमध्ये पोहोचलो. आम्ही लिमिट मध्येच असल्यामुळे ताड ताड चालत जाऊन डेस्क वर पोहोचलो. आणि लगेच फोन लावला.
आम्ही चौघे ऑफिस मध्ये होतोएकाच टीम मध्ये अजून सुद्धा चौघांचे विचार एकदम विरुद्ध होते.
एकाचे मत होतं "आता काही आपले खरे नाहीतिकडे सगळा घोटाळा होणार आणि पूर्ण रात्र ऑफिस मध्ये जाणार एकतर माझे हे काम नाही तरी लटकवले आहे मला"
तर दुसरा म्हणत होता " देवावर विश्वास ठेवात्याचा कृपेने सगळ ठीक होईलचिंता नको. हरी ओम"
"अरे काहीही प्रोब्लेम येऊ देआपण आरामात फिक्स करू .." तिसरा ह्या मताचा होता.
आणि शेवटचा असा विचार करत होता "काहीही होऊ देतिघांपैकी कोणीतरी पाहून घेतील काळजी नसावी".   
राशींप्रमाणे माणसाचा स्वभाव असतो म्हणतात, आयटीमध्ये डेझिगनेशन प्रमाणे विचार बदलतात असो.
फोनची रिंग ने आमची झोपमोड केलीतिकडून पहिली बातमी आली. अपेक्षेप्रमाणे ती चांगली नव्हती. म्हणजे आमची सिस्टीम व्यवस्थित चालू होती, नेहमीप्रमाणे प्रश्नच नाही. आपला तो बंडू दुसर्या कंपनीचं ते कार्ट...
आतापण नेटवर्कमध्ये काहीतरी प्रोब्लेम होता. पण आम्ही काही आता सुटका नाही हे स्वच्छ दिसत होत.

AC १८ डिग्रीने हवेचा झोत सोडत असूनसुद्धा असून सुद्धा वातावरण एकदम गरम होतेप्रसंगच तसा होताउच्च पदावरील अधिकार्याचे केबिनएकदम हॉट झालेला तो कस्टमरकोणालाही सुटणार नाही असा प्रॉब्लेम आणि त्याचे solution काढण्यासाठी जमलेले ५ -६ लोक.
शाळेत आपण जे काही विज्ञान शिकलो त्याचा आयटी मध्ये काही उपयोग नाही. सगळेच नियम इथे उलटे आहेत.
एखादी गोष्ट खूप हॉट झाल्यावर वितळतेइकडे हॉट झालेल्या कस्टमरला वितलवण्यासाठी त्याला कुल डाऊन करावे लागते.
"every action has equal and opposite reaction" हा नियम घोकम पट्टी करून तुम्ही आम्ही मार्क मिळवले आहेत. पण Every reaction ( of customer ) starts many actions on us
हे समजायला थोडी वर्ष लागतात.

एक साधा नियम आहे कोणताही प्रोब्लेम एकाला सोडवायला दिला तर तो सहज सुटतोदोघा तिघांनी मिळून फिक्स करायचा असेल तर तो थोडा कॉम्प्लेक्स बनतो. ४ -५ जणांच्या discussion मध्ये साधा प्रोब्लेम पण गंभीर बनतोत्याचे मुख्य कारण म्हणजे एकाचे solution कसे चुकीचे आहे ह्याची ५ वेगवेगळी कारणे समोर येतात. १० - १२ मिटींग्स नंतर पहिलेच solution निवडले जाते हि गोष्ट वेगळी. आणि इथे तर ६-७ लोक होते आणि ते हि मैनेजेर्स.. पहिला अर्धा एक तास चांगली चर्चा झालीमग चर्चेचे रुपांतर सामुहिक आणि नंतर वैयक्तिक भांडणात झाले. सगळेजण आपला मुद्धा उचलून धरत होते 
त्यादिवशी माझ्या ज्ञानात थोडी मोलाची भर पडली.
"वो देखना पडेगा" ह्याचा आयटी मधला अर्थ असा कि एकतर मला येत नाही किंवा मला करायचे नाही. आपल्याकडे समोरच्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर सरळ हे उत्तर देऊन मोकळ व्हावं.
२ -३ तासाचा गंभीर चर्चेनंतर शेवटी असे ठरले कि आज रात्री परत एकदा टेस्ट करून पाहू आणि मग ठरवू की करायचे.  रात्री २ वाजता परत काम चालू झालेआम्ही सकाळी ६ पर्यंत प्रॉब्लेम शोधात होतो. आम्ही चार तास ज्या प्रश्नाचे उत्तर शोधत होतो तो आलाच नाहीत्या दिवशी परत तो प्रॉब्लेम आलाच नाही. दुसर्या दिवशी सगळीकडून आमचे कौतुक होत होते. कौतुकाचे मेल्स येत होतेपण मी मनात ह्याच विचारात होतो कि आपण असे नक्की काय केले...

"अरे झोपतोस काय उठ. नेटवर्क इंजिनियरला कॉलवर आहे"
मित्राच्या आवाजाने मी भानावर आलो. हे तर मागच्या महिन्यात घडलेले मी स्वप्नात पाहत होतो. मग जसा मागच्या वेळी काहीच न करता प्रॉब्लेम संपला तसाच आता पण संपला झाले तर किती बरे होईल असा स्वार्थी विचारने मी फोन उचलला. कॉल १ -२ तास चालला आणि अर्थातच प्रॉब्लेम पण संपला.
सुटलो ... एकदाचे आम्ही सुटलो. आषाढी पौर्णिमेच्या ढगाळ रात्री अंधारात पन्हाळा उतरूनशत्रूच्या पहिल्या छावणीतून बाहेर पडल्यावर मावळ्यांच्या मनात जे भाव असतील तसे आमचे भाव होते. आमचे काम झाले होते आम्ही फक्त तोफांची वाट पाहत होतोएकदा डेटा सेंटर मधून कॉल आला कि आम्ही सुटलो घरी. काल पासून ऑफिस मध्ये घालवलेल्या १६ तासांपेक्षा आताचे १६ मिनिट जास्त वाटत होते. .. आणि आलाच  अखेर फोन ची रिंग वाजलीआता सुटलो ह्या आनंदात मी फोन उचलला.

"बॉस, Where are you ? आजच्या GO LIVE ची प्लानिंग मीटिंग आहेलवकर ये"
फोन मैनेजर चा होता.
"काय ??"


थबकून मी घडयाळ पाहिलं सकाळचे ११.३०.
हा सगळाच भास होता. मी चक्क दिवसा स्वप्नं पाहत होतो. अजून बाकी आहे दिवस..आणि रात्रीचे go live पण.. नुसत्या जुन्या आठवणीनी मी थकलो होतो अजून संपूर्ण दिवस समोर होता  समोर दिसणाऱ्या मीटिंग रूमच्या दाराकडे पाहत म्हणलो,
"आजचा दिवस खरच खूप मोठा आहे"

Monday, June 18, 2012

आला आला पाऊस, अचानक हाताला आले  काम.
आला आला पाऊस, अचानक हाताला आले  काम.

घड्याळ हाताशी घट्ट असूनही हाताला फुटला घाम
आज कलयुगात हाताला तृणमूल हि नाही हो दाम.

हाताचे मोल तृण ठरवते किती आहो हे अमंगळ.
ह्या अंधकारात मग कसे फुलणार हो विकासाचे कमळ.

अंधारात शेवटी हाताच्या कंदिलच कामी येतो.
हत्ती नसेल तरीही सायकल वरून तो शिखरावरती पोहोचतो.

पाकळ्यांच्या भांडणात कमळाचे फुलणे काही होत नाही.
धनुष्यधारी असूनहि तो राम आपल्याला कोठे दिसत नाही.

रिकामा खिसा, लोन घेतलेले नशिब कसे आम्हाला हो तारणार.
नवीन पहाट, पहिले सोनेरी किरण तरी करतील का हो काही नवनिर्माण.

Monday, February 13, 2012

४ आकड्यांचा प्रवास...




ऱेल्वेचा प्रवास हा माझा तसा आवडता प्रवास. ह्या मागे कारण तिथे मिळणारी मोकळीक, का झोपायला मिळणारा बर्थ, का प्रवासात भेटणारी माणस, का बसमध्ये नसलेलं toilet ह्या पैकी एक ठरवणे तसं अवघड आहे. पण तरी रेल्वेने कितीहि दूर जाण्यासाठी मी नेहमी तयार असतो. रेल्वे म्हणलं काही गोष्टी ठरलेल्या असतात, मी शेकडो वेळा प्रवास केला असेल पण कधीही सुरवातीपासून confirm seat मिळालेली नाही, अगदी २ - ३ महिने आधी बुकिंग केले तरी माझा नंबर waiting मध्येच येतो. मग त्यादिवशी आधी तो चार्ट शोधा, चार्ट नाही सापडला तर तो TC शोधा, आपल्या बोगी पासून आपण १० डब्बे लांब आहे म्हणून पळापळ करा. २ तास आधी पासून तुम्ही स्टेशनवर आलात तरी स्लॉग ओवर मध्ये हि धावपळ करावीच लागते।


आज आम्ही तसे थोडे निर्धास्थ होतो, seat नेहमीप्रमाणे confirm नव्हतीच पण आमच्या काकांकडे इंटरनेट असलेला mobile असल्यामुळे. "आपली seat काही जात नाही रे कुठे, एक मिनिटात मोबाईलमध्ये कळेल" असे बोलून काकांनी मला गप्प केले. मला मोबाईलमधले फारसे काही कळत नाही, खरंतर मी कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यात मोबाईलवरती इंटरनेट आणि फेसबुक म्हणजे तर कहरच. कुत्रे आपण का पाळतो, घराचे रक्षण त्याला करता आले म्हणजे बास. त्याला मागच्या पायावर उभे राहता येते किंवा त्याला पेपर उचलून आणता येतो, ह्याचा दोन क्षणांची करमणूक ह्या पलीकडे काय उपयोग आहे. मोबईलचेहि तसेच आहे. दुसर्या लोकांनी आज काय काय केले हे आपण आपला पैसा घालवून पाहत बसण्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही. असो तर गाडी सुटण्यासाठी १० मिनिट्स असताना काकांनी IRCTC वर आमचे seat नंबर पहिले. ९४३ आणि ९४४, आता एक डब्यामध्ये ७२ बर्थ असल्यामुळे हे नंबर कुठले...ह्या गोंधळात आम्ही पडलो.. ५ मिनिटे बाकी असल्यामुळे परत आमची TC शोधण्याची धावपळ चालू... ९४३ म्हंजे S9 ४३ हा उलगडा झाल्यानंतर आम्ही आमच्या जागेवर पोहोचलो. आजकाल रेल्वेमध्ये मला एक निराळीच चिंता असते, आपल्या समोर बसलेले आतिरेकीच आहेत आणि त्यांच्याकडे बॉम्ब आहे. एकदा सगळ्यांची पाहणी आणि त्यांच्या सामानाची पाहणी केल्यावर मला हायस वाटलं, त्यापैकी कोणी त्यातले वाटत तर नव्हते. एव्हाना गाडी सुटली होती आमचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु झाला होता. आमच्या बाजूला एक गुजराथी कुटुंब.. समोर एक मुस्लीम कुटुंब असे आमचे शेदारी होते. गुजराथी प्रवासी ओळखणे अगदी सोपे असते, गाडी सूटल्यानंतर पहिल्या १० मिनिटात जो चिवड्याचा डब्बा उघडतो तो गुजराथी... त्याच कुटुंबामध्ये एक अतिशय सोज्वळ आणि सुंदर मुलगी होती. आमच्या समोर बसलेल्या मध्ये दोन जोडपी होती. त्यातल्या एका नवरा बायकोचे भांडण चालू होते आणि दुसरे दोघे त्याची समजूत काढत होते. दहा तासांच्या प्रवासात सुरवातीलाच नवरा बायकोच्या भांडणाचा फार्स मिळाल्यामुळे आम्ही खुश


काकांनी अगदी समाधान होई पर्यंत माहिती घेतली।


"आपके चेहेरे पे लिखा है कि आपको अच्छा जीवनसाथी मिला है"


काकांच्या ह्या वाक्यानंतर तिच्या चेहर्यावरती एकदम कुतूहल जागे झाल्याचे माझ्या लक्षात आले।


"आपको face reading आता है ?"


"face reading जादा नाही लेकीन हात कि रेखा पढना आता हैं"।


काकांच्या ह्या उत्तरांनी मी तीन ताड उडालो. माणसाचे वय कितीही झाले तरी परक्या बाईचा हात हातात घेण्याची संधी तो सोडत नाही।


"तो आप इनका हात देखके बताओ ना की क्या ये आदमी कभी पैसा कमाएगा" .. माझे हसू लपवण्यासाठी मी दुसरीकडे पाहू लागलो. माझं लक्ष त्या गुजराथी मुली कडे गेलं, पेपरचा आधार घेऊन ती गुपचूप माझ्याकडे पाहत होती. जशी आमची नजर एकमेकांना भेटली तसा तिने आपला चेहरा पेपरने झाकला. मला मोठी गंमत वाटली. एकदोन वेळा हाच प्रकार झाल्यानंतर मला खात्रीच पटली कि ती माझ्याच कडे पाहत होती. एक वेणी, सुंदर जांभळी रंगाचा ड्रेस, रेखीव डोळे ह्यामुळे चेहरा साधा असूनसुद्धा ती सुंदर दिसत होती. तिच्या डोळ्यांचा रंग काही मला ठीक दिसत नव्हता कारण तिचा चष्मा मध्ये येत होता. आमचा एकमेकांकडे चोरून पाहण्याचा खेळ चालू झाला होता. मग मी ठरवले कि तिला खूण करून चष्मा काढायला लावायचा. मी वेगवेगळ्या खुणा करून तिला हे सुचवू लागलो. काही वेळानंतर तिला माझी खूण समजली असावी कारण तिने चष्मा कडून ठेवला. थोडीशी निळसर झाक असलेले तिचे डोळे पाहून तर मला वेड लागले. रात्रीचे जेवण झाले होते आता मी थोडे धाडस करायचे ठरवले. तिचा मोबाईल नंबर मिळावा म्हणून तिला माझा मोबाईल दाखवला. तिने मला पाच अशी खूण केली. पाच ने कुठला मोबाईल नंबर चालू होतो ? तिच्या डाव्या हाताने ती चार ची खूण करत होती.. हात तिच्या ती पहिला आकडा ९ सांगत होती. सगळे नेटवर्क ९ नेच चालू होतात तो नंबर सांगायची काय गरज शेवटी सगळ्या पोरी म्हणजे ... आज नंबर इतर आकड्यांनीही चालू होतात पण तेव्हा तसे नव्हते.


असो .. आमचा पुढच्या नंबरसाठी परत दम-सराज चालू झाला. ती खुणेने कॉलर दाखवत होती. आता कॉलरवरून नंबर कसा समजणार. माझा शर्ट हिरवा होता पण त्याचा नंबर काही संबंध नाही. कॉलर मध्ये ३ अक्षरे आहेत म्हणजे पुढचा नंबर ३ असावा असे वाटले म्हणून मी बोटांनी ३ अशी खुण केले. तिने कपाळावर हात मारून घेतला. कोणीतरी जवळ असल्यामुळे तिला हाताने खुण करता येत नव्हती. परत कॉलर .. मला काही कॉलरचे कोडे सुटत नव्हते. मला एक कळत नाही ज्या मुलाशी आपली धड ओळख नाही, ओळख सोडा एक शब्दहि बोलणे नाही त्याला कोडी कसली घालायची. आणि मी तरी ती का सोडवायची. पण तरीहि मी सोडवायचा खूप प्रयत्न करत होतो, एकतर फुकट आणि मुंबई उद्या सकाळी येणार होती त्यामुळे करण्यासारखे दुसरे काहीच नव्हते. अचानक माझे लक्ष माझ्या बर्थ नंबर कडे गेले, मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. ती मला कॉलर नाही बर्थ नंबर सुचवत होती. कोणीतरी एकदम लाईट बंद केले. अजून ८ नंबर बाकी आहेत ह्या काळजीने मला झोप येत नव्हती. गाडी अगदी पहाटेच बोरीवली ला पोहोचणार होती. लोकांच्या गडबडीचनेच मला जाग आली. उतरण्यासाठी लोक सामानाची आवरावर करत होते आणि ती कदाचित मी उठण्याची वाट पाहत होती कारण मी तिच्याकडे पाहिल्या पाहिल्या तिने मला पुढचे दोन नंबर सांगून टाकले , म्हणजे हाताने ४ आणि ३. स्टेशन जवळ येत होते, गाडी हळू हळू थांबत होती. तिची सामानाची आवारावर चालू होती. पर्स ठेवताना, air bag आवरताना तिची हळूच येणारी एक नजर मला अस्वस्थ करत होती. मी सर्व प्रकारे तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. गाडी बोरीवलीला थांबली, लगेचच सगळीकडे धावपळ उडाली. त्या गडबडी मध्ये ती कुठेतरी दिसेनाशी झाली. उतरणारे प्रवासी आणि हमाल लोकांची कटकट कमी होण्यासाठी बराच वेळ लागला. शेवटी मीच निश्चय करून platform वर उतरलो. अर्थातच माझे डोळे तिला शोधू लागले. ऑफिससाठी लोकलची वाट पाहणारे मुंबईकर आणि पाहुण्याला receive करायला आलेले ह्यांनी तो platform गजबजून गेलेला होता. अचानक गर्दी मध्ये काहीतरी शोधणारा तिचा चेहरा मला दिसला. ती कदाचित मलाच शोधात असावी कारण आमची परत नजरभेट झाल्यावर तिचा चेहरा एका हलक्याश्या स्मिताने खुलला. शिट्टीच्या आवाजाने मी भानावर आलो. गाडी पुढच्या प्रवासाला निघाली होती. मी बोगीच्या दारामध्ये थांबलो, मागे वळून परत तिच्याकडे पाहिलं, आपण परत कधीच भेटणार नाही हे आम्हाला माहित होत. गाडीने आता वेग घेता होता, आधी ती मग गर्दी मग platform सगळ दिसेनास झाल. मी बराच वेळ तसाच दारामध्ये उभा होतो आणि हातामधल्या कागदकडे निरखून पाहत हसत होतो. त्यावर फक्त ४ नंबर होते ९७४३ .........



Nilesh Patankar

Monday, January 30, 2012

२०११ - मागे वळून पाहताना......

२०११ - मागे वळून पाहताना......

मार्च मध्ये निसर्गाचा रुद्रावतार मिळाला पाहायला.
त्याच दिवशी ठरवले जपानला जायच्या आधी शिकले पाहिजे पोहायला ....

एप्रिलची सुरवातच झाली लंकेला हरवून..
ILP च्या गडबडी मध्ये विजयाचा आनंद साजरे करणे गेले राहून .....

मे मध्ये आपल्या शेदार्याचा खोटारडेपणा सगळ्या जगाला दिसला
जगभर शोधून शेवटी लादेन पाकिस्तानच सापडला ...

AUGEST मध्ये आण्णांनी देशावर घेतली कमांड
लोड शेडींग नसतानाही मेणबत्यांची अचानक वाढली डिमांड ....

ऑक्टोबर येताच म्हणाला आता भारतात होणार फोर्मुला वन
दसर्याला दहन करून सुद्धा दिवाळीत परत आला रा - वन

नोव्हेंबर संपत आला तरी पडली नाही थंडी
इंटरनेटवर मात्र सगळे म्हणत होते . व्हाय थिस कोलावेरी डी ....

महागाई, आण्णा, 2G काहीही झाले तर सरकारची हलली नाही खुर्ची
सचिनचे १०० वे शतक मात्र होणार पुढच्या वर्षी .....


- निलेश पाटणकर..

माझी पहिली छापील प्रगती - Calender 2012