Sunday, October 2, 2011

सामान्य लोकांचे नशीबच झाले हो स्वस्त ...

आज सकाळी मी ठरवले दूध प्यावे मस्त ..

दूध वाला म्हणाला ४० रुपये झाले फक्त ....

हे ऐकून विकत घेण्याची मी नाही केली हिंमत

म्हशीला तरी माहित असेल का तिच्या दुधाची किंमत.

घरी येता येता ठरवले उद्याच गोठा विकत घेऊ.

नंतर म्हणालो मरुदेना ... आपला कटिंगच पिऊ.

आता आमच्या हातात रडणेच उरले हो फक्त ....

सामान्य लोकांचे नशीबच झाले हो स्वस्त ...

बायको म्हणाली उद्या लोनावल्याला जाऊ...

मस्त ठंडी - पावसात गरम गरम भजी खाऊ ..

जाता जाता केली फूल पेट्रोलची टाकी...

क्रेडिट कार्डच्या भरोश्यावर टोल पण ठेवला नाही बाकी...

महिन्यानंतर बँकेने बिल पाठवले मस्त ..

नंतर वाटले पुण्यातच भजी पडली असती स्वस्त....

आता आमच्या हातात रडणेच उरले हो फक्त ....

सामान्य लोकांचे नशीबच झाले हो स्वस्त ...

No comments: